आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पिंपळे रोड ते धुळे रोडला जोडणारा रस्त्यावर भुयारी गटारींचे खोदकाम केल्यामुळे माती रस्त्यावर पडली आहे. यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून चालता येत नाही. पालिकेने हा रस्ता वापरण्यास योग्य करावा अन्यथा स्वातंत्र्य दिनाला ताे रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा शहरातील प्रभाग आठमधील नागरिकांना पालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे ते धुळे रोडला जोडणाऱ्या रस्ता ४० फुट रुंदीचा आहे. या रस्त्यावरून पुढे ढेकू रोड, पिंपळे रोड व गलवाडे रस्त्यावरील सर्व कॉलन्यांकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा वावर असतो. मात्र, या रस्त्यावर वेड्या वाकड्या पद्धतीने भुयारी गटारीचे खोदकाम झाले आहे. नियमाप्रमाणे ठेकेदाराने भुयारी गटारीच्या चाऱ्या बुजून रस्ता पूर्वीप्रमाणे मजबूत करून देणे गरजेचे आहे. परंतु, ठेकेदाराने भुयारी गटारीची माती इतरत्र टाकून दिली. चाऱ्या व्यवस्थित न बुजल्याने वारंवार खड्डे पडत आहेत. परिणामी नागरिकांना रस्त्यावर धड चालता येत नाही. या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही पालिका, जीवन प्राधिकरण विभाग दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे भुयारी गटार व रस्त्याचे काम होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी व कायमचा बंद करावा. अन्यथा १५ ऑगस्टला हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करू, यास प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा प्रभाग आठमधील रहिवाशांनी पालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर माजी नगरसेवक विवेक पाटील, संजय पाटील, आकाश बोरसे, राजेश बोरसे, प्रवीण पाटील, विजय भदाणे, एस. व्ही. पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, अरुण पाटील, पुंडलिक पाटील, गिरधर पाटील, पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, विश्वेश पाटील, निंबा पाटील, संभाजी पाटील, किसनराव पाटील, विकास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.