आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपोषित:महेलखेडीत आढळले कुपोषित बहिण-भाऊ ; कुटुंबाची समजूत काढून दोघांना विशेष कक्षात हलवले

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील आरोग्य पथकाला महेलखेडी गावात एकाच कुटुंबातील बहिण-भाऊ कुपोषित आढळले आहेत. पथकाने त्यांच्या कुटुंबांची समजूत काढत दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील कुपोषण विशेष कक्षात दाखल केले. याशिवाय कोरपावली गावात ८ वर्षीय मुलगी एचआयव्ही एड्स बाधित आढळली. तिच्यावर देखील उपचार सुरू केले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे आरोग्य पथक शाळा व अंगणवाडी स्तरावर बालकांची नियमित आरोग्य तपासणी करते. या पथकास बुधवारी महेलखेडी गावात अश्मिरा मुराद तडवी (वय ६ महिने) व अर्शद मुराद तडवी (वय २ वर्ष ३ महिने) हे दोन बालके कुपोषित आढळली. यापैकी अश्मिरा तीन महिन्यांची असतानाच तिची आई सोडून निघून गेली. तेव्हापासून आजी त्यांचा सांभाळ करत आहे. परिणामी तिला आईचे दूध मिळू शकले नाही. आजी तिला गाईचे दूध देऊन सांभाळत आहे. दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शबाना तडवी, आरोग्य सेविका चारू नेमाडे यांना हे दोन्ही बालके कुपोषित आढळली. त्यांनी कुटुंबीयांची समजूत काढून दोघांना जिल्हा रुग्णालयातील संदर्भ सेवा विशेष कुपोषित कक्षात दाखल केले आहे.

दोन महिन्यांत ४५ कुपोषित बालके राष्ट्रीय बाल स्वास्थ पथकाला यावल तालुक्यात एप्रिल महिन्यात २२ आणि त्यानंतर मे महिन्यात १९ व आता महेलखेडी येथील दोन असे दोन महिन्यात एकुण ४५ कुपोषित बालके आढळली आहेत. एवढेच नव्हे तर कोरपावली येथे आरोग्य तपासणी दरम्यान गावातील ८ वर्षीय बालिका एचआयव्ही बाधित आढळली. तिचे आई-वडिल देखील बाधित होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. तिच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे आयसीटीसी समुपदेशक वसंत कुमार सदानशिव यांच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...