आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानिटकरांचे मत‎:मानसिक आरोग्यासाठी  आता‎ मानस ॲप ठरणार उपयुक्त‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी विद्या‎ शाखेतील विद्यार्थ्यांच्या समस्या‎ सोडवण्यासाठी आरोग्य विज्ञान‎ विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु का कट्टा’ उपक्रम‎ सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या ‎समस्यांवर उपाय शोधण्यासाठी या‎ उपक्रमातून प्राप्त माहितीव्दारे अनेक बाबी‎ पुढे येत आहे. त्यानुसार विद्यापीठाकडून ‎निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.‎ विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मानसिक ‎आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘मानस’‎ अॅप उपयुक्त आहे. असे मत लेफ्टनंट जनरल‎ माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी व्यक्त‎ केले आहे. कुलगुरू का कट्टा या उपक्रमाचे‎ ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते.‎

या कार्यक्रमात कुलगुरु कानिटकर यांनी‎ विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले‎ की, मानस म्हणजे मेंटल हेल्थ आणि‎ नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टम या प्रणालीचे‎ विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंकचे‎ उद्घाटन विद्यापीठाचे कुलपती तथा‎ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते‎ नुकतेच करण्यात आले आहे. कार्यक्रमास‎ प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, आयुर्वेद व‎ युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत‎ देशमुख, होमिओपॅथी विद्याशाखेचे डॉ.‎ धनाजी बागल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ‎ यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...