आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभमंगल:जानेवारीपर्यंत चाळीसगावात मंगल कार्यालये बुक

चाळीसगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनंतर स्थळ पाहणे वधू-वर पित्यांनी सुरु केले आहे. अनुरुप व पसंतीच्या स्थळांना हाेकार मिळाल्यानंतर तारखा काढण्यासाठी ज्येष्ठ मंडळी सरसावू लागली आहे. शनिवारपासून तुळशी विवाह सुरू झाल्याने आता लग्नांचे मुहूर्तदेखील निश्चित होतील. तज्ज्ञांच्या माहितीनुसार यंदा एकुण ५७ मुहुर्त आहेत. त्यादृष्टीने जानेवारीपर्यंत चाळीसगाव शहरातील बहुतांश मंगल कार्यालये बुक झाले आहेत.

एप्रिल वगळता सर्वच महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे चाळीसगाव शहरातील भडगाव रोडस्थित वाणी मंगल कार्यालय, भूषण मंगल कार्यालय, पाटीदार भुवन, वैभव मंगल कार्यालय, हिरापूर रोडस्थित गणेश मंगल कार्यालय, लक्ष्मी मंगल कार्यालय व करगाव रोडस्थित सिद्धिविनायक हॉल आदी ठिकाणी सध्या बुकिंग सुरू आहे. दरम्यान, ५ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला सुरुवात झाली. ८ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाची सांगता होईल. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी यंदाची पहिलीच लग्नतिथी आहे.

यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने मुक्त वातावरणात वर-वधू हजारोंच्या उपस्थितीत बोहल्यावर चढणार आहेत. जून २०२३पर्यंत लग्नाचे शुभ मुहूर्त असल्याने वधू-वर आपल्या सोयीने व आपले आर्थिक बजेट बसवत मंगल कार्यालये, हॉलची बुकिंग करत आहेत. जी तिथी माेठी असेल त्या दिवाशी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे आधीच मंगल कार्यालय, कॅटरर्स, बँडवाले, घोडेवाले, वाहने बुकिंग करण्याकडे वधू व वराकडील मंडळींनी प्राधान्य दिले आहे.

दबापिंप्रीत धनगर समाजातर्फे तुळशी विवाह
रत्नापिंप्री | पारोळा तालुक्यातील दबापिंप्री येथे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या शुभ मुहूर्तावर धनगर समाजाने परंपरेनुसार तुळशी विवाह साजरा केला. या वेळी भगवान श्रीकृष्ण व तुळशीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर तुळशी विवाह पार पाडला. धनगर बांधवांसह गावातील महिलांसह पुरुषांची यावेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...