आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली करण्यात आली:पोलिस निरीक्षकपदी मानगावकर नियुक्त

यावल4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकपदी राकेश मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबत आदेश काढले. यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तथा आयपीएस आशित कांबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांची तात्पुरती बदली करण्यात आली होती.

मात्र गुरुवारी पोलिस अधीक्षकांनी मानगावकर यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. गुरुवारी सायंकाळी मानगावकर यांनी भागवत यांच्याकडून पदभार घेतला. कायदा-सुव्यवस्था स्वीकारण्यास प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...