आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशी नृत्य:तळईतील स्नेहसंमेलनात‎ मराठी गाण्यांनी रंगत‎

तळई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सद्गुरु श्री गोविंद महाराज‎ शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक‎ विद्यालयात जल्लोष उत्सवाचा या‎ दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन‎ उत्साहात साजरा झाले.‎ प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ‎ नागरिक मुरलीधर महाजन, निवृत्त‎ शिक्षक सुकदेव सोनवणे, पांडुरंग‎ महाजन, सरपंच भाईदास मोरे,‎ उपसरपंच प्रभाकर पाटील होते.‎ उद्घाटन माजी सभापती ओंकार‎ पाटील यांच्या हस्ते झाले.‎ अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष‎ रमाकांत रोकडे होते.

उपाध्यक्ष‎ बबनराव पाटील, सचिव नरेंद्र‎ पाटील, संचालकांची कार्यक्रमास‎ उपस्थिती हाेती. विद्यार्थ्यांनी शहीद‎ जवानांना सलामी देत, नृत्य,‎ शिवचरित्र, खान्देशी नृत्य,‎ खंडेरायाचे लग्न, मराठी, हिंदी‎ गाणे, रिमिक्स आदी प्रकार सादर‎ करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.‎ सूत्रसंचालन शिक्षक पी. एन.‎ तामस्वरे, जयश्री पाटील, शिक्षिका‎ वैशाली पाटील, मनीषा पवार यांनी‎ केले. या वेळी ग्रामस्थांची माेठी‎ उपस्थित हाेती. अहिराणी गाण्यावर‎ मान्यवरांसह सर्वांनीच ठेका धरला‎ हाेता. कार्यक्रमास मुख्याध्यापक‎ एस. एम. माळी, सर्व शिक्षक‎ त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी‎ सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...