आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी ८ वाजता सामूहिक गुढीची उभारणी करून तीचे विधिवत पूजन करण्यात आले.
५०० कोटी जलसाठा अभियानाचे प्रवर्तक डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण तसेच आमदार मंगेश चव्हाण, प्रदीप देशमुख, मेजर नातू, संपदा पाटील, प्रतिभा पाटील व सुनीता घाटे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. नववर्ष स्वागत गीताने श्रावणी कोटस्थाने व स्नेहल सापनर यांनी कार्यक्रमास प्रारंभ केला. गुढीसाठी मंत्रघोष सचिन देशपांडे व दीपक मुळे यांनी केले. समितीच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक सुनीता घाटे यांनी केले. कार्यक्रमास प्रीतमदास रावलानी, लालचंद बजाज, बाळासाहेब नागरे, लक्ष्मीकांत पाठक, सर्पमित्र राजेश ठोंबरे, चंद्रशेखर उपासनी, उद्धवराव महाजन, नगरसेवक संजय पाटील, प्रा. आर. एम. पाटील, सविता राजपूत, आप्पा भालेराव, शंतनू पटवे व रवी राणा याचबरोबर चाळीसगाव व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शालिग्राम निकम यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमास संस्कार भारतीचे तालुकाध्यक्ष गितेश कोटस्थाने, विवेक घाटे, शंकर पाठक, प्रकाश कुळकर्णी, दिलीप संन्यासी, आधार महाले, रमेश पोतदार, अजित कासार, सुहासिनी पाठक, शामल कोटस्थाने, शुभांगी संन्यासी, प्रिया कासार यांनी सहकार्य केले. डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण म्हणाले की, भक्ती, शक्ती आणि संस्कृतीची ही गुढी अमृत-कुपी ठरली आहे. स्वर्गीय डॉ. सुनील घाटे यांनी सुरू केलेली ही गुढी सर्व चाळीसगावकरांना नव्हे तर खान्देश वासियांना प्रेरणादायी ठरली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रिया कासार यांनी सहकार्य केले. डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण म्हणाले की, भक्ती, शक्ती आणि संस्कृतीची ही गुढी अमृत-कुपी ठरली आहे. स्वर्गीय डॉ. सुनील घाटे यांनी सुरू केलेली ही गुढी सर्व चाळीसगावकरांना नव्हे तर खान्देश वासियांना प्रेरणादायी ठरली आहे, असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.