आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांडणी:माथेफिरूने खांडणीयोग्य कांद्यावर फिरवले रोटर ; यावलमधील प्रकार, अडीच लाखांचे नुकसान, गुन्हा दाखल

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका शेतकऱ्याच्या ४ एकर क्षेत्रावरील खांडणीयोग्य कांदा पिकावर अज्ञात माथेफिरूने रोटर फिरवले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. यात शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. शहरातील रहिवासी पुरूषोत्तम वेडू मोरे व संजय वेडू मोरे यांनी गट क्रमांक १९२० या ४ एकर क्षेत्रात फेब्रुवारीत कांदा लागवड केली होती. हा कांदा आता खांडणीयोग्य झाला होता. शनिवारी सकाळी पुरूषोत्तम मोरे यांनी मजुरांना मशागतीसाठी पाठवले होते. मात्र, मजूर शेतात गेल्यावर कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर केलेले दिसले. मजुरांनी ही माहिती मोरे यांना दिली. त्यांनी शेत गाठून पाहणी केल्यावर ४ एकर कांदा माथेफिरूने रोटर फिरवून अडीच लाखांचे नुकसान केल्याचे दिसले. या प्रकरणी यावल पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक तथा आयपीएस आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार बालक बाऱ्हे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...