आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मु काश्मिर मधील पुंछ येथे भारत मातेचे रक्षण करतांना पायावर बर्फ पडल्याने गंभीर जखमी झालेले वाकडी येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित पाटील यांचा उपचारादरम्यान बुधवारी 16 तारखेला मृत्यू झाला होता. त्यांना शुक्रवारी शासकीय इतमामात सकाळी 12.30 वाजता मानवंदना देऊन अंतिम निरोप देण्यात आला. पाच वर्षीय मुलाने भडाग्नी देताच उपस्थितांना गहिवरून आले होते.
वीर जवान अमित पाटील यांचे पार्थिव जम्मु काश्मिर येथून दिल्ली येथे व तेथून इंदुर येथे आणण्यात आले. इंदुर येथून सैन्यदलाच्या तुकडीने खास वाहनाद्वारे हे पार्थिव चाळीसगाव येथे आणले. सकाळी 9 वाजता नागद चौफुली येथून सजवलेल्या सैन्य दलाच्या वाहनातुन नागद चौफुली ते वाकडी पर्यत त्यांचे पार्थिव नेण्यात आले. सकाळी साडे दहा वाजता पार्थिव वाकडी येथे पोहोचले. सुरुवातीला अमित पाटील यांच्या घरी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. शहीद जवान अमित पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी नेताच त्यांचे आई, वडील, पत्नी, मुलं व लहान भावाने प्रचंड आक्रोश केला.
भारत माता की जयच्या घाेषणांनी अासमंत दणाणला -
त्यानंतर अकरा वाजता त्यांची अंत्ययात्रा घरापासून अंत्यविधीच्या स्थळांपर्यंत सजवलेल्या ट्रॅक्टरमधुन काढण्यात आली. हजाराच्या संख्येने नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले हाेते. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत हाेती. शहीद जवान अमित पाटील अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणांनी आसमंत दणाणून उठला हाेता. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली. याप्रसंगी माजी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आ.मंगेश चव्हाण, आम. राजुमामा भाेळे आदींची उपस्थिती होती.
आमदारांनी घेतली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी-
बंदुकीच्या तीन फैरी झाडून अमित पाटील यांना सैन्य दल व पोलीस दलातर्फे अखेरची मानवंदना देण्यात आली. त्याचा पाच वर्षाचा मुलगा भुपेश याने भडाग्नी उपस्थित सर्व गहिवरून गेले होते. आ. मंगेश चव्हाण यांनी, तरूणांना प्रेरणा मिळावी यासाठी वाकडी भव्य स्मारक उभारू असे सांगत वीरगती प्राप्त झालेले जवान अमित पाटील यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारल्याचे जाहीर केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.