आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:जामनेरमध्ये भाजपविरोधात‎ मविआचा जनआक्रोश मोर्चा‎

जामनेर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर येथे भाजप सरकारविरुद्ध महाविकास‎ आघाडीतर्फे गुरुवारी जन आक्रोश मोर्चा‎ काढण्यात आला. या वेळी बेरोजगारी भाव‎ वाढीबरोबरच कापसाला भाव देण्याची मागणी‎ करण्यात आली.‎ पाचोरा रोडवरील महाराणा प्रताप‎ चौकापासून तहसील कचेरीपर्यंत ट्रॅक्टर,‎ बैलगाड्यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत‎ महाविकास आघाडीतर्फे जन आक्रोश मोर्चा‎ काढण्यात आला.

या वेळी केंद्र व राज्य‎ शासनाच्या फसव्या धोरणांविरोधात‎ घोषणाबाजी करण्यात आली. बेरोजगारी,‎ भाववाढ अशा विविध मुद्द्यांना हात घालून‎ शेतकऱ्यांच्या कापसालाही १५ हजार रुपये‎ प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी‎ करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे‎ जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, स्थानिक नेते‎ संजय गरुड, तालुकाध्यक्ष विलास राजपूत,‎ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत‎ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित‎ होते. तहसील कचऱ्यावर तहसीलदार सुभाष‎ कुंभार यांना निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...