आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:केळी विमा मिळवून देण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक

रावेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना हवामानावर आधारित केळी फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

गेल्या वर्षी केळी पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या व निकषांत बसल्यामुळे विम्याचा लाभ मंजूर झालेले अनेक शेतकरी अजूनही भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना त्वरित मंजूर रकमा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल व विमा कंपनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेण्यात येईल. त्यात विमा रकमेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम वर्ग करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील, असे आमदार पाटील यांनी सांगितले. यामुळे विम्याचा लाभ मंजूर होऊनही अद्याप रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना माेठाच दिलासा मिळू शकणार असून बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...