आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:ज्येष्ठ नागरिक मंडळाची‎ सभा; शहिदांना अभिवादन‎

अमळनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पूज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक‎ मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा‎ शिवाजीराव पाटील यांच्या‎ अध्यक्षतेखाली घेण्यात अाली.‎ बैठकीत प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते‎ प्रतिमापूजन करून २६/११च्या‎ हल्ल्यातील शहिदांना व इतर दिवंगत‎ व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात‎ आली.‎ प्रमुख वक्ते पी. एस. पाटील यांचा‎ मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील‎ यांनी सत्कार केला. पी. एस. पाटील‎ यांनी ज्येष्ठ नागरिकांना उद्भवणाऱ्या‎ समस्या व आरोग्याविषयी मार्गदर्शन‎ केले. प्रवीण साळुंखे यांनी आरोग्य‎ विम्याविषयी मार्गदर्शन केले.

शिवाजी‎ पाटील यांनी विनोदी किस्से तर कृष्णा‎ पाटील यांनी अहिराणी कविता सादर‎ केली. या सभेत वार्षिक वर्गणी १००‎ रुपयांवरून २०० रूपये १ एप्रिलपासून‎ वाढवण्याला सर्व सदस्यांनी एकमुखाने‎ मंजुरी दिली. या प्रसंगी पूज्य साने‎ गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे‎ उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव‎ राजेंद्र नवसारीकर, सहसचिव‎ अजबराव पाटील तसेच सदस्य कृष्णा‎ पाटील, श्रावण पाटील, केशवराव‎ बोरसे अादी उपस्थित हाेते. राजेंद्र‎ नवसारीकर यांनी पाहुण्यांचा परिचय,‎ सूत्रसंचालन करुन आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...