आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखान्देशी इन यूएईमधील सभासदांनी भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन व खान्देशी महोत्सव अबुधाबी येथे एकत्र येऊन जल्लोषात साजरा केला. या वेळी काही जणांनी अहिराणी गीते सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यात बालगोपाळांनी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. यूएईमधील वेगवेगळ्या इमारतीतील २०० हून अधिक खान्देशी बांधव यानिमित्त एकत्र आले होते.
मुलांसाठी पेंटिंग व विविध खेळ घेण्यात आले. तसेच मोठ्यांनी मैदानी खेळांचा आनंद लुटला. प्रत्येक जिल्ह्याच्या चमूने खेळाच्या माध्यमातून सगळ्यांना आपली ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आयोजन भूषण चौधरी, महेश जायखेडकर, घनश्याम पाटील, राहुल पाटील, गणेश बोरसे, चंद्रशेखर जाधव, योगेश पगार यांनी केले हाेते.
फॅशन-शोसाठी मोहिनी अमृतकर, पल्लवी अमृतकर, स्वाती भोळे, विविध खेळ व पेंटिंगसाठी कमलेश जगताप, सायली पाटील, दीपाली चौधरी, योगेश गाजरे, योगेश अमृतकर, रजिस्ट्रेशन साठी पिनल चौधरी, सुचिता भामरे, आशिष भोळे, छायाचित्रणासाठी अनिल वायकर, संजय पाटील, चेतन जावळे, भोजन व्यवस्थेसाठी अमोल भामरे, डिजेसाठी मनोज बागल यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी अहिराणी गाण्यांवर ठेका धरला हाेता. या वेळी उपस्थित खान्देशी बांधवांनी वेगवेगळे कलाप्रकार सादर करुन लक्ष वेधून घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.