आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:पालिकेसमोरील व्यापारी संकुल; जामनेरातील मुख्य रस्त्यावर लावली 30 झाडे

जामनेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेसमोरील व्यापारी संकुल व मुख्य रस्त्यावर दाट सावली देणारे व फुलांची सुमारे ३० झाडे लावून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पिंपळाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.

ब्रम्हकुमारी आश्रमाच्या प्रमुख दिदी यांच्यासह नगरपरिषदचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे डॉ.प्रशांत पाटील, ज्येष्ठ वृक्षमित्र सुकदेव महाजन, एम.एस.पंडित, कपिल शर्मा, डॅा.अमोल सेठ, कर्ण बारी, सुहास चौधरी, डॅा.सी.यु.पाटील, डॅा.आशिष महाजन, डॅा.योगेश, डॅा.विनोद भोई, सुहास पाटील, मनिष वर्मा, श्रीपाद पेडगावंकर, सुनील ठाकरे, ललित कोठारी, गणेश राऊत, गजानन माळी, पुरुषोत्तम माळी, सागर माळी, विजय शिवदे, संतोष भोई, धनंजय सोमवंशी, अक्षय चौधरी, अजय शिवदे, ऋषिकेश पवार, मिलींद माळी, डॅा.आशिष वाघ, डॅा.स्वप्नील सैतवाल, डॅा.नंदलाल पाटील, डॅा. संदिप पाटील, डॅा.सतीश चौधरी, डॅा.प्रशांत महाजन, डॅा.निलेश काळे, डॅा.रमेश पाटील, डॅा.राजेश सोनवणे, डॅा.नरेश पाटील, डॅा. सागर पंडित, डॅा.विरेंद्र पाटील, डॅा.जयंत महाजन उपस्थित होते.

झाडांच्या सुरक्षा व संवर्धनासाठी पक्क्या बांधकामात लोखंडी जाळी बसवल्या व चंद्रकांत बावस्कर यांच्या सहयोगाने प्रत्येक झाडाला ठिबकने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. येत्या काही दिवसात वृक्षहीन झालेल्या जळगाव रोडवर टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...