आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तेली समाजातर्फे 192​​​​​​​ विद्यार्थ्यांचा गुणगौरव; चाळीसगाव तालुका तेली समाज मंडळाने राबवला उपक्रम

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव तालुका तेली समाज मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थी गुणगौरव तसेच सामाजिक राजकीय व अन्य क्षेत्रांमध्ये यश, निवड झालेल्या तालुक्यातील समाज बांधवांचा सन्मान सोहळा ४ रोजी तेली समाज मंगल कार्यालयात पार पडला.तेली समाजाचे तालुकाध्यक्ष सुरेश चौधरी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी चाळीसगाव शहर व तालुक्यातील समाजबांधव व विद्यार्थी हजर होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

आगामी काळात सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती सुरेश चौधरी यांनी दिली. विवाह सोहळा समिती प्रमुख म्हणून बाळासाहेब चौधरी यांची निवड करण्यात आली. न्यायमूर्ती माधुरी चौधरी, बिडिओ एकनाथ चौधरी, भावेश चाैधरी, हितेश चाैधरी, हिरालाल चाैधरी, भूषण चौधरी, तेली समाजाचे तालुकाध्यक्ष सुरेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सचिन चौधरी, शहराध्यक्ष दिलीप चौधरी, सेक्रेटरी बाबूलाल पवार, सेक्रेटरी गोकुळ चौधरी, सहसचिव विवेक चौधरी, उपाध्यक्ष आर. के. चौधरी, बाळासाहेब चौधरी, भारत चौधरी, शांताराम चौधरी, सोमनाथ चौधरी, अमृत चौधरी, कार्याध्यक्ष रामलाल चौधरी आदी हजर होते.

कार्यक्रमास यांचे लाभले सहकार्य
गुणपत्रकाचे वाचन रामलाल चौधरी, मनोज करंकाळ, दत्तू चौधरी, ईश्वर चौधरी, भागवत चौधरी यांनी, सूत्रसंचालन विवेक चौधरी यांनी, प्रास्ताविक मनोज चौधरी तर राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले. गुणगौरव सोहळ्यास विजयदीप ज्वेलर्सचे संचालक दिलीप चौधरी, शुभ डेव्हलपर्सचे संचालक भारत चौधरी, सोमनाथ चौधरी यांच्यासह चाळीसगाव तालुका तेली समाज मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...