आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम:‘गिरणा वॉटर कप स्पर्धेचा पिचर्डे गावातून प्रारंभ, हजारोंचे श्रमदान; अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ

भडगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे ४०० किमी पदयात्रा करुन खासदार उन्मेश पाटील यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. गिरणा नदीच्या विकासासाठी त्यांनी राबवलेले गिरणा पुनरुज्जीवन अभियान अभिनव उपक्रम ठरणार आहे. हे अभियान गिरणा खोऱ्याच्या विकासाची सामाजिक चळवळ झाली असून, निश्चितच ही चळवळ नदी विकासासाठी राज्याला दिशादर्शक ठरली असल्याचे, गौरवोद्गार माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

१ मे रोजी गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत खासदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून गिरणा वॉटर कप स्पर्धेचा शुभारंभ, तसेच महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ अभिनेता सयाजी शिंदे यांच्याहस्ते पिचर्डे गावी करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

सयाजी शिंदे यांनी कुदळ मारून महाश्रमदान अभियानाचा शुभारंभ केला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रमसैनिकांच्या कामाचे कौतुक करुन गिरणा वॉटर कप मध्ये सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढवला. खासदार उन्मेश पाटील यांनी स्पर्धेमागची भूमिका मांडली.

बातम्या आणखी आहेत...