आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:मराठा सेवा संघातर्फे एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसींचा जाहीर निषेध

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएम पक्षाचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी जाणीवपुर्वक दौलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होण्याची कृती केली. त्यांची ही कृती निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला खिजवण्यासाठी केल्याचे सांगून मराठा सेवा संघातर्फे औवेसी यांचा निषेध केला आहे. ओवेसी हे गुरुवारी औरंगाबादमध्ये एका शैक्षणिक संस्थेच्या पायाभरणी कार्यक्रमास आले होते. ज्या औरंगजेबाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वेठीस धरून अराजकता माजवली, महिलाची अब्रू लुटली, छत्रपती संभाजी महाराजांना हाल-हाल करून मारले, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली. अशा विकृत राक्षसी माणसाच्या कबरीवर या ओवेसींनी नतमस्तक होऊन हिंदू बांधवांच्या भावना तर दुखावल्या आहेच; परंतु त्यांच्या या कृतीमुळे सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण होऊन सामाजिक अशांतताही निर्माण झाली आहे. त्यांच्या या विकृत कृतीमुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी शनिवारी मराठा सेवा संघातर्फे येथील तहसीलदार व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष अरुण पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, सुधीर पाटील, धनंजय चव्हाण, पी.एन. पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...