आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौरा:मंत्री धनंजय मुंडे उद्या अमळनेरच्या दौऱ्यावर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

अमळनेर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे शनिवारी (दि.७) अमळनेर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

यानंतर मुंडे यांच्या उपस्थितीतच अमळनेर मतदारसंघातील इंधवे (ता.पारोळा) येथे सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संवाद मेळावा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीचे कार्यालय धुळे रोडवरील सिद्धीविनायक कॉलनीत झाले आहे. त्याच्या उद्घाटनाला माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर चेअरमन, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार राजीव देशमुख, चाळीसगाव माजी आमदार साहेबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...