आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गिरीश महाजन यांना दिले निवेदन:चोपडा रस्त्यावर अडवला मंत्र्यांचा ताफा; भाकपने केली शिरपूर ते चाेपडा रस्ता दुरुस्तीची मागणी

चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा, शिरपूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभागातर्फे कोट्यवधींचा निधी या रस्त्यावर खर्च केला जातो. मात्र, रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहेत. शिरपूर रस्त्यावरील तरडीजवळ मोठा खड्डा असून या खड्ड्यात अनेकांचे जीव गेलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा तत्काळ बुजवून येथे नव्याने पूल बांधावा, अशी मागणी आज शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे करण्यात आली. या संदर्भात धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे शिरपूरकडे जात असताना त्यांच्या गाडीचा ताफा अडवून त्यांना थेट निवेदन दिले.

मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदन स्वीकारुन रस्त्यांची दयनीय अवस्था ही वस्तुस्थिती असून तत्काळ रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिले. तसेच निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाइलद्वारे संपर्क करू तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी, शिरपूर तालुका भाकपचे सेक्रेटरी अॅड. संतोष पाटील, धुळे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष डॉ. किशोर सूर्यवंशी, धुळे जिल्हा भाकप सेक्रेटरी वसंत पाटील, अर्जुन कोळी, माजी राज्य कौशल सदस्य साहेबराव पाटील, शिलदार पावरा, सूरजमल जैन, जितेंद्र देवरे, सचिन थोरात, कंवरलाल कोळी, कमलाकर पाटील, कैलास पाटील, रवींद्र पाटील, तुळशीराम पाटील, कावा पावरा, योगेश पावरा, बापू अहिरे, हरचंद पावरा, भरत सोनार यांच्यासह परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात या मागण्यांचाही समावेश
भाकप, महाराष्ट्र राज्य किसान सभा, धुळे जिल्हा लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे शिरपूर, चोपडा राज्य मार्गावरील तरडीजवळ रास्ता रोको आंदोलन करुन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, चोपडा ते शिरपूर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून याच रस्त्यावरील जगन्नाथ पाटील यांच्या शेताजवळ पुल बांधावा, ज्यांनी रस्ते निकृष्ट केले आहेत अशा ठेकेदारांवर कारवाई करावी, धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, हिसाळे येथे तलाठी सजा कार्यालय सुरू करावे, शिरपूर तहसील कार्यालयातून वृद्ध, अपंग, निराधार यांना सर्व योजनांचे पैसे मिळावेत.

बातम्या आणखी आहेत...