आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता मुलगी दिसली:अमळनेर येथील बेपत्ता मुलगी गवसली धुळ्यात; रागात सोडले होते घर, पोलिसांनी घेतला शोध

अमळनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून बेपत्ता झालेली १५ वर्षीय मुलगी धुळे येथे आढळली. रागातून ती घरातून निघून गेल्याने तिचे कुटुंबिय चिंतित होते. मात्र, पोलिसांनी त्वरित शोध घेतल्याने, मुलगी सुखरूप घरी परतली. त्यामुळे कुटुंबियांचा जिव भांड्यात पडला.

शहरातील एका शाळेची नववीची विद्यार्थिनी २७ रोजी दुपारी घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत अमळनेर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासण्यात आले होते. तसेच पोलिसांनी मुलीची माहिती सर्वत्र व्हायरल केली होती. त्यामुळे धुळे येथे एका व्यक्तीला ही मुलगी दिसली. त्या व्यक्तीने अमळनेर पोलिसांना फोन करून मुलीस मोहाडी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांकडे सोपवले होते. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तात्काळ पीएसआय अक्षदा इंगळे व मुलीचे पालक यांना त्याच दिवशी मध्यरात्री धुळे येथे पाठवून मुलीस परत आणले. एकाच दिवसात मुलगी सुखरुप घरी आल्याने पालकांनी पोलिसांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...