आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ:आमदार चिमणराव पाटील यांचा लवकरच मंत्रिमंडळात समावेश

एरंडोल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सुमारे आठ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आमदार चिमणराव पाटील व भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार चिमणराव पाटील मतदारांच्या मनातील मंत्री असल्यामुळे त्यांना लवकरच मंत्रीमंडळात संधी मिळेल असा विश्वास यावेळी अॅड.काळकर यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, आनंदा चौधरी (भगत), माजी सरपंच रवींद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील, जहिरोद्दीन शेख कासम, राजेंद्र माळी, चिंतामण पाटील, प्रमोद महाजन, योगेश महाजन, छाया दाभाडे, आनंद दाभाडे, अमोल जाधव, उपसभापती मधुकर पाटील, विकास बोरसे, मयूर महाजन, कृष्णा ओतारी उपस्थित होते.

नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी २७ कोटी लवकरच मिळणार
नगरपालिकेच्या सहकार्याने सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे वेगाने सुरु असल्याचे आमदार चिमणराव म्हणाले. शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी २७ कोटी रुपयांची मंजुरी लवकरच मिळणार आहे.

या कामाचे झाले भूमिपूजन
नवीन वसाहत आणि गांधीपुरा भागातील उद्यानाचे भूमिपूजन, कासोदा दरवाजा येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरण, माझी वसुंधरा चौकाचे लोकार्पण, स्मशानभूमी व आठवडे बाजार येथे सोलर विद्युतीकरण, आठवडे बाजार चौकाचे लोकार्पण, पेव्हर ब्लॉक या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवले
अॅड.काळकर म्हणाले, शहरात विकासकामे करताना सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवले आहेत. स्मशानभूमी,आठवडे बाजार, डॉ.आंबेडकर चौक, सार्वजनिक उद्यान यांचे सौंदर्यीकरण करण्यात आल्याने विकासात भर पडली आहे. मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी प्रास्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...