आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल चोरी:पारोळा बसस्थानकात मोबाइल चोरास पकडले

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बस स्थानकात प्रवाशाच्या खिशातून मोबाईल लांबवताना चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडले. भोकरबारी येथील बाळू रामदास पाटील हे लग्नासाठी जळगावला जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. साक्री ते जळगाव बसमध्ये ते चढत असताना त्यांच्या शर्टाच्या खिशात ठेवलेला मोबाईल काढताना चोरटा तन्वीर शेख अब्दुल रहीम शेख (वय १९, रा. गेंदालाल मिल, उस्मानिया पार्क, जळगाव) याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

चोरलेला मोबाईल फिर्यादीला परत केला. चोरट्याला न्यायाधीश माने यांच्यासमोर हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नाना पवार पुढील तपास करत आहेत. संशयिताची सखोल चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...