आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:बहिणीचा विनयभंग; भावाला सक्तमजुरी

जामनेर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोहरीतांडा येथील स्वत:च्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या सख्ख्या भावाला शनिवारी जामनेर न्यायालयाने तीन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अति-शीघ्र खटला चालवून केवळ दोन महिने १२ दिवसात जामनेर न्यायालयाचे न्यायधीश डी. एन. चामले यांनी हा निर्णय दिला.

डोहरी तांडा येथील तरूण २८ मार्च २०२२ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत घरात आला. या वेळी घरात झोपेत असलेल्या सख्ख्या बहिणीचा त्याने विनयभंग केला. या वेळी घरात आई देखील झोपलेली होती. या प्रकारामुळे तरुणीने आरडाओरड केल्याने जाग आलेल्या आईने मुलाच्या तावडीतून मुलीला सोडवले. या वेळी त्याने आईसह बहिणीला धमकी ही दिली. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या तरुणाला जेलमध्ये कुणीही जामीन झाला नसल्याने तो जेलमध्येच होता.

साक्षीदार फितूर तरी शिक्षा : ही घटना घडली तेव्हा नागरिकांनी आई, मुलीला धीर दिला व आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, साक्षीदार फितूर झाले हाेते. परंतु, ठाम असलेल्या तक्रारदार महिलेमुळे न्यायाधीश यांनी आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे कृतिका भट यांनी बाजू मांडली.