आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव:मोटारसायकल चोरट्याला अटक, चोरीच्या दोन दुचाकी केल्या जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई

कारवाई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रांजणगाव येथे घरासमोर लावलेली दुचाकी लंपास झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या ४८ तासांत मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्यास जेरबंद केले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने चोरीच्या दोन मोटारसायकली काढून दिल्या. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

रांजणगाव येथील अलीम कुतुबुद्दीन टकारी यांनी मंगळवारी रात्री १० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते लघुशंकेला उठले असता घरासमोर लावलेली दुचाकी त्यांना दिसली नाही. शोध घेऊनही दुचाकी न मिळाल्याने त्यांनी ग्रामीण पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक लोकेश पवार, सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे यांच्या पथकाला माहिती मिळाली की, संशयित रतन दगडू अहिरे (वय ४१) रा. रांजणगाव यानेच ती मोटारसायकल चोरलेली आहे. दोन दिवसांपासून तो फरार झाला आहे. पथक त्याचा शोध घेत असताना रतन अहिरे हा बुधवारी रात्री ११.३४ वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरात फिरताना मिळाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

बातम्या आणखी आहेत...