आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे आंदोलन:बीएसएनएलच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन ; पाचोरा येथे बीएसएनएल कार्यालयासमोर धरणे

पाचोरा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण देशात अखिल भारतीय बीएसएनएलच्या निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर पाचोरा येथील कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

या वेळी पाचोरा व भडगाव येथील बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे पाचोरा येथील कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजता तासभर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष एम. एस. पाटील, सचिव पी. एस. संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली तासभर धरणे आंदोलन करण्यात आले. १ जानेवारी २०१७पासून १५ टक्के वेतनवाढ द्यावी, १ एप्रिल २०२२पासून पेन्शन वाढ द्यावी, पेन्शन, महागाई भत्ता मिळण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी अशोक शिंदे, पांडुरंग धनवडे, अनिल बावचे, सुनील अहिरे, रवींद्र पाटील, आत्माराम पाटील, भिमसिंग पाटील, लक्ष्मीकांत कुळकर्णी, संतोष वाघ, चिराग उद्दिन यांच्यासह निवृत्त कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बीएसएनएलच्या निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठी घोषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...