आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापारी संकूल:व्यापारी संकूल पाडण्यासाठी पालिकेची जय्यत तयारी ; व्यापारी न्यायालयीन लढ्याच्या तयारीत

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पंडित दीनदयाल व्यापारी संकूल, जवाहरलाल व्यापारी संकुल व जनता मार्केट असे तीन व्यापारी संकुले पाडण्याची जय्यत तयारी जामनेर पालिकेने केली आहे. काही व्यापारी न्यायालयीन लढाईच्या तयारीत असल्याची शक्यता पाहता पालिकेने जामनेर न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. जामनेरातील सध्याच्या नगरपालिकेच्या इमारतीसह पंडित दीनदयाल व्यापारी संकुल, पंडित जवाहरलाल व्यापारी संकुल व जनता मार्केट अशी जीर्ण झालेली तीनही व्यापारी संकुले पाडण्याचा ठराव जामनेर पालिकेने घेतला आहे. त्यासाठी रितसर ठराव घेऊन प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, पालिकेच्या या निर्णयाविरोधात जामनेर पालिकेच्या तीनही संकुलातील काही व्यापारी न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. पालिकेच्या सध्याच्या इमारतीच्या पाठीमागे नवीन इमारत व व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्यात आहे. त्यातील गाळ्यांच्या लिलावासाठी व पालिकेच्या नवीन इमारतीला अडथळा ठरलेल्या इमारतीसाठी जुनी इमारत पाडणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जीर्ण व पडाऊ झालेले व्यापारी संकुल ही नागरिकांच्या जीवितास धोका ठरण्याची शक्यता पाहता तेही पाडण्याची गरज आहे. त्यासाठी पालिकेने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असून जामनेर न्यायालयात कॅव्हेटही दाखल केले आहे. व्यावसायिकांमध्ये नाराजी ... शहराच्या मध्य व मुख्य ठिकाणी जामनेर पालिकेच्या इमारतीखाली पंडित दीनदयाल व्यापारी संकुल आहे. समोर पंडित जवाहरलाल व्यापारी संकुल असून पश्चिमेकडील रस्त्यावर जनता मार्केट आहे. या तीनही व्यापारी संकुलात आज ३८ व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. पूर्वीपासून घेतलेली दुकाने व स्थिरस्थावर झालेला व्यवसाय पाहता व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. पालिकेनेही सावध भूमिका घेत कॅव्हेट दाखल केले असून संकुलातील व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरूवात झाली आहे.

व्यावसायिकांना स्थलांतरासाठी ३० दिवसांची मुदत जीर्ण झालेल्या तीनही व्यापारी संकुलातील ३८ गाळेधारकांना नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. व्यावसायिकांना स्थलांतरासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. व्यापारी संकुल पाडण्याची कायदेशीर तयारी झालेली आहे. - चंद्रकांत भोसले, मुख्याधिकारी, पालिका, जामनेर

बातम्या आणखी आहेत...