आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:पिंप्री येथे वृद्धेच्या गळ्यावर वार करुन खून ; पाचोरा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

कजगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरदेवळा येथून जवळच असलेल्या पिंप्री प्र.भ. येथील वृद्ध महिलेची भरदिवसा घरात घुसून धारदार विळ्याने खून केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजसबाई पूना जाधव (वय ८०) असे मृत महिलेचे नाव असून ३१ मे रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. मृत वृद्धेच्या गळ्यावर विळ्याने दोन वार करण्यात आले आहेत. तेजसबाई जाधव यांना दोन मुले आहेत, ते बाहेरगावी नोकरीस असून त्या एकट्याच पिंप्री येथे राहत होत्या. ३१ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घटना लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, घटनास्थळी हजर झाले. १ जून रोजी सकाळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी पाहणी करून ठसे घेतले.

तेजसबाई जाधव या घरी एकट्याच राहतात, तर ३१ रोजी सायंकाळी त्यांच्या घराचे दिवे अद्याप लागले नाहीत, अशी माहिती गावातील त्यांच्या नातेवाइकांना कळवण्यात आली. त्यानंतर घराच्या आत जावून पाहिले असता तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करुन त्यांची हत्या झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मृत महिलेचा भाचा भागवत बळीराम कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात ४५२, ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. १ जून रोजी दुपारी अंत्यसंस्कार झाले.

बातम्या आणखी आहेत...