आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:खूनप्रकरणातील पसार संशयिताला अटक

भडगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालिकेला विहीरीत फेकून दिल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला दाखल खुनाच्या गुन्ह्यातील, पसार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथून ताब्यात घेतले. जितेंद्र उर्फ नाना जंगल ठाकरे (रा.कराब, ता. भडगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याला भडगाव पोलिसांकडे सोपवले आहे.

१८ जून रोजी काकनबर्डी येथे जितेंद्र ठाकरे याचा पत्नीसोबत वाद झाला होता. या वादातून त्याने दोन वर्षांच्या खुशी नावाच्या बालिकेला विहिरीत फेकून दिले होते. त्यानेही विहीरीत उडी मारली होती. मात्र ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याने पलायन केले होते.

बातम्या आणखी आहेत...