आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फत्तेपूर सोसायटीत आघाडी प्रणीत पॅनलची मुसंडी; भाजप प्रणीत पॅनलचा पराभव

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फत्तेपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत आघाडी प्रणीत बळीराजा पॅनलचा सर्व १३ जागांवर विजय झाला. तर भाजप प्रणीत सहकार पॅनलच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर पार पडलेली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वीची नांदी असल्याचे मत आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

फत्तेपूर विकासो निवडणुकीत आघाडी प्रणीत बळीराजा पॅनलच्या नेत्यांनी बैठका घेऊन, उमेदवार निश्चिती करून आघाडी घेतली होती. तोवर निवडणूक लागल्याचेही भाजपच्या स्थानिक नेत्यांना ज्ञात नव्हते. आघाडी प्रणीत पॅनलच्या नेत्यांनी मतांची संख्या पाहून सामाजिक गणितांच्या आधारे उमेदवार देऊन सूक्ष्म नियोजन केले होते. त्यामुळेच बळीराजा पॅनलच्या सर्व १३ जागांवर विजय मिळाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झालेली विकासो निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची नांदी असल्याचे मत आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कांॅग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

भाजपला मिळवता आली नाही एकही जागा
भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विकासो निवडणुकीकडे दुर्लक्ष झाले. विरोधी पक्षाच्या उमेदवारांची निश्चिती होईपर्यंतही भाजप नेते अनभिज्ञ होते. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली. आघाडी प्रणीत पॅनलने सामाजिक गणिते जुळवून दिलेल्या उमेदवारांच्या तुलनेत तुल्यबळ उमेदवार देणे अशक्य झाले. त्यातच नेत्यांमधील समन्वयाअभावी उमेदवारांची फरफट झाली.

विजयी उमेदवार
सर्वसाधारण मतदार संघ : तेजमल बागमार (१७७), वाय. सी. चौधरी (१७२), रमेश तेली (१६९), संतोष नेरे (१६३), संदीप बरकले (१५९), मोहन फिरके (१५९), परमसिंग मथूरे (१५४), खलीलखॉ पठाण (१४८), इतर मागासवर्ग प्रवर्ग : गणेश चोपडे (१७१), महिला राखीव : सरुबाई प्रकाशा पाटील (१६९), विजयाबाई नाना पाटील (१७०), अनुसुचीत जाती जमाती : उत्तम दौलत सोनवणे (१७१), भटक्या विमुक्त जाती/जमाती : प्रभाकर भोई (१८०).

बातम्या आणखी आहेत...