आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:घरकुलाच्या यादीतून नाव वगळले; पिंप्री खुर्दच्या युवकाचे उपोषण सुरू

पाचोरा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंप्री खुर्द प्र.पा. येथे शासनाच्या सर्व अटी , शर्तीत बसत असताना ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यादीत असलेले नाव ठरावाद्वारे कमी केले व त्या जागी गावातील धनदांडग्या व्यक्तीचे नाव वाढवण्यात आले. त्यामुळे अन्याय झाल्याने येथील युवक विजय किसन पाटील याने बुधवारी येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. गुरुवारी या उपोणाचा दुसरा दिवस होता.

विजय पाटील याचे सन २०१८ च्या सर्वेक्षणानुसार घरकुल योजनेच्या यादीत नाव होते. यानंतर शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीने एप्रिल, मे महिन्यामध्ये ठराव केल्यानंतरही यादीत नाव असताना ग्रामसेवक व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी द्वेष बुद्धीतून व हेतुपुरस्सरपणे विजय पाटील याचे नाव वगळून त्याच्या जागी धनदांडग्या लोकांचे नाव यादीत घेतले. पाटील याने १५ तारखेची चौकशी करुन कारवाई करण्याबाबत पाचोरा पंचायत समितीला लेखी निवेदनाद्वारे कळवले होते. मात्र पंचायत समितीने कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्याने पाटील याने १५ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले.

प्राधान्य क्रमांकानुसार योजनेचा लाभ देऊ : बीडीओ
पिंप्री खुर्द प्र.पा. येथील विजय किसन पाटील याने पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी उपोषण सुरू केले आहे. ही योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने व सर्व काम ऑनलाइन होत असल्याने त्यात काहीच करता येत नाही. विजय पाटील याचे नाव यादीत १०३ व्या क्रमांकावर आहे. पहिल्या टप्प्यात ८ ते १० घरकुले आहेत. यामुळे क्रमांकानुसार व टप्प्याटप्प्याने यादी पुढे गेल्यानंतर त्याचे नाव येईल. तेव्हा त्यास आपसूक घरकुल योजनेचा लाभ मिळेल, असे बीडीओंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...