आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरा लगतच्या खेड्यापाड्यांसह अन्य तालुक्यातील तब्बल नऊ हजारावर मतदारांची नावे जामनेरत असल्याची तक्रार काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत केली. तर साडेसहा हजार मतदारांची नावे दुबार दिसत असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
जामनेर येथे गुरुवारी आधार जोडणी, दुबार नावे, मृत मतदारांची नावे व गाळून फोटो स्पष्ट करणे, यासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी जामनेर शहरालगतच्या पळासखेडा, हिंगणे, गारखेडा, हिवरखेडा, टाकरखेडा, टाकळी, चिंचोली पिंपरी यासह अन्य तालुक्यातील तब्बल ८ ते ९ हजार मतदारांची नावे जामनेर शहराच्या मतदार यादीत असल्याची तक्रार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी केली. तसेच एकलव्य नगर, गणेश वाडी, शास्त्री नगर, पुरुषोत्तम नगर अशा ठिकाणी २०० ते २२०० मतदार हे आदिवासी असल्याचे मतदार यादीत दाखवण्यात आले आहे.
नाेटीस बजावून अतिरिक्त नावे कमी केली जाणार
जामनेर येथील मतदार यादीत १० हजारांवर दुबार नावे असल्याची तोंडी तक्रार राजपूत यांनी केली आहे. त्यासाठी कुठलाही सबळ पुरावा दिलेला नाही. मात्र, असे असले तरी मृत नावे, स्थलांतरित झालेली नावे, एका पेक्षा अनेक ठिकाणी असलेली नावे वगळून मतदार यादी अपडेट करण्याचे काम सुरू झाले आहे. ६ हजार ४०० मतदारांची नावे एकापेक्षा अनेक ठिकाणी दिसून आली आहेत. संबंधितांना नोटीस बजावून सबळ पुरावे पाहुन ती नावे कमी केली जातील, असे मत उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवडे यांनी व्यक्त केले.
९६ हजार ६३० मतदारांचा आधार डेटा जमा
जामनेर तालुक्यात एकूण ३ लाख १३ हजार मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ९६ हजार ६३० मतदारांचा आधार डेटा जमा झालेला आहे. उर्वरित मतदारांचा डेटा जमा करून झाल्यानंतर आधार-कार्ड मतदार यादी-सोबत जोडले जाणार आहे. त्यामुळे आपोआपच दुबार नावे वगळले जातील, असेही उपजिल्हाधिकारी हुलवडे यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.