आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:चाळीसगाव एज्यु.सोसायटीक्रीडा संकुलाचे नामकरण

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी नारायणदास अग्रवाल यांनी व्यायाम शाळेची उभारणी केली. त्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गुढी पाडव्याला कुस्त्यांचे सामने भरवले जातात. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांनी राजकारण, समाजकारण, आध्यात्म, शिक्षण, संस्कृती, धार्मिक क्षेत्रात उत्तुंग काम उभे केले, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा संकुल व माध्यमिक विद्यालयाचे “नारायणदास मांगीलाल अग्रवाल’ नामकरण सोहळा पार पडला. नारायणदास यांच्या बरोबरीनेच त्यांची भावंडे व परिवाराने ख्यातनाम उद्योजक व दातृत्वाचे उदाहरण समोर उभे केले. त्यांच्या माध्यमातून शेकडोंना काम मिळाल्याचे आमदार चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...