आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:नांद्रा विकासोची बिनविरोध निवड

पाचोरा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नांद्रा विकास सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकित १३ जागांसाठी २३ अर्ज आले होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सभासदांचा आग्रह होता. त्या अनुषंगाने गावातील प्रतिष्ठित नागरिक व दोन्ही पॅनल प्रमुखांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली.

दाेन्ही पॅनलमधील अभिमान पाटील, मुरलीधर सूर्यवंशी, रामकृष्ण पाटील, नंदलाल बागुल, राजाराम कुंभार, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, सूर्यकांत तावडे, कुसुमताई तावडे, प्रताप तावडे, भारती सूर्यवंशी, विमलताई बाविस्कर, सरुताई पाटील यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविराेध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भागवत पाटील यांनी कामकाज पाहिले. बिनविराेध निवडीसाठी माजी सभापती नितीन तावडे, माजी चेअरमन विश्वनाथ पाटील, सुभाष तावडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, साहेबराव तावडे, शिवाजी तावडे, पंकज बाविस्कर, विश्वंभर सूर्यवंशी, सरपंच विनोद तावडे, मनोज सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

या उमेदवारांची बिनविराेध निवड
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वसाधरण गटातून यशोदा सूर्यवंशी, अशोक तावडे, रमेश पाटील, संतोष तावडे, लक्ष्मण बोरसे, समाधान बाविस्कर, परमेश्वर पाटील, बालू पाटील, इतर मागास गटातून वसंत पाटील, महिला राखीव मतदार संघातून आशाबाई तावडे, संगीता सूर्यवंशी, अनुसूचित जाती मतदार संघात सुमित साळवे, भटक्या जाती मतदार संघातून विमल भोई हे विजयी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...