आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गोंडगावला हाेणार राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील श्री क्षेत्र गोंडगाव येथे २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान राष्ट्रसंत जगतगुरू जनार्दन स्वामींच्या पुण्य स्मरणार्थ राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा आयोजित केला आहे. तसेच प.पूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी बाबाजींच्या ३३ व्या पुण्य स्मरणार्थ राष्ट्र निर्माण धर्म सोहळ्यात पुरुष व महिला जपानुष्ठान, एकनाथी भागवत पारायण, ३३ कुंडी यज्ञासह नामसंकीर्तन जप, अखंड नंदादीप, हस्तलिखित जप साधना, कीर्तन सप्ताह आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.

गोंडगाव येथे बाबाजींच्या कुटीयाजवळ जय बाबाजी परिवाराची नियोजनाबाबत बैठक पार पडली. या धर्म सोहळ्याचे मार्गदर्शनासाठी वेरूळचे विश्वस्त शिव अंगुलगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या बैठकीला स्थानिक व जिल्हा कमिटीचे नियोजन करण्यात आले. प्रास्ताविक धरणगावचे तालुका सेवक दगडू गुरुजी यांनी केले. जिल्हा सेवक संजय पाटील, जिल्हा संपर्क सेवक अंबरसिंग पाटील व पी.के. मोरे, रामचंद्र पाटील, पाचोऱ्याचे सेवक राजेंद्र पाटील व धुळ्याचे जिल्हा सेवक रोहिदास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीला भडगाव तालुका सेवक अशोक पाटील, पारोळा तालुका सेवक रवींद्र पाटील, धरणगावचे तालुका सेवक दगडू गुरुजी, जामनेरचे तालुका सेवक डॉ.परदेशी, यावलचे प्रकाश पाटील, अमळनेरचे कैलास महाजन, अरुण बोरसे, जिल्हा सहसेवक अजय पाटील व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील उपस्थित होते. यावेळी गोंडगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जय बाबाजी भक्त परिवाराचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

बातम्या आणखी आहेत...