आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युनिसिपल गव्हर्नन्स घटकांतर्गत कार्याची नाेंद:पाचोरा नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक जाहीर

पाचोरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारे स्कॉच सिल्व्हर अवॉर्ड येथील नगर परिषदेला नुकताच माझी वसुंधरा अभियानांतर्गत म्युनिसिपल गव्हर्नन्स या घटका अंतर्गत मिळाला असून सर्वत्र काैतुक हाेत आहे. शहरात पर्यावरण संवर्धन करण्याचा ध्यास घेऊन नगर परिषद जोमाने काम करत आहे. त्यात उद्यान विकसित करणे, नदीची स्वच्छता करणे, कचरा मुक्त शहर बनवणे, अपारंपरिक ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन संगोपन करणे, शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तूंना बंदी घालणे, दैनंदिन घनकचरा संकलन करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

या कामांचे नियोजन करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर यशस्वीपणे मात करून नगर परिषदेने केलेल्या विकास कामांचे प्रकल्प अहवाल तयार करून दिल्लीच्या स्कोच संस्थेला पाठवले होते. प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून नगर परिषदेकडून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना प्रकल्पाची ऑनलाइन मांडणीची संधी दिली. तिचे सोने करत मुख्याधिकारी बाविस्कर यांनी प्रकल्पाची उत्कृष्टरीत्या मांडणी करून नागरिकांचे अभिप्राय व ऑनलाइन वोटिंगद्वारे उत्कृष्ट कामगिरी करत परिषदेने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत देशातील प्रगत शहरांच्या प्रकल्पाशी स्पर्धा करून नगर परिषदेने म्युनिसिपल गव्हर्नन्स या प्रकारात सिल्व्हर अवॉर्ड पटकावले.

हे सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ : बाविस्कर
नगर परिषदेला मिळालेले यश माझे एकटीचे नसून ते मी व माझ्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. यापुढे देखील असेच सहकार्य शहरातील नागरिकांनी केल्यास पाचोरा नगर परिषदेचे नाव अधिक उज्वल करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल, असा निर्धारही मुख्याधिकारी शाेभा बाविस्कर यांनी केले. नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथही घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...