आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:नेरीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

नेरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल असंवैधानिक भाषेत टीका करणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ नेरी येथे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे पत्र पोलिस ठाण्यात देऊन नेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.राज्यात नवीन सरकार येऊन तीन महिने उलटत असताना राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मात्र महिलांबाबत असंवेदनशील व असंवैधानिक भाषेत बोलत आहेत. मंत्री म्हणून या राज्याच्या जबाबदाऱ्या ज्या प्रतिनिधींच्या खांद्यावर आहेत, तेच राजकीय नेते कोपरखळ्या देताना चुकीची वक्तव्याचा सर्रास करत आहेत.

सरकारने याबाबत योग्य ती कारवाई करावी, त्याची सुरुवात गृह खात्याने करावी व अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात पाउले उचलावी या मागणी सोबतच कृषी मंत्र्यांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी पोलिस ठाण्यात पत्र देऊन या मागण्या करण्यात आल्या. या वेळी नेरी येथील राष्ट्रवादीचे प्रमुख दिनेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील, ज्येष्ठ नेते आबासाहेब पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर खोडपे, आशिष दामोदर, युवा सरचिटणीस सागर कुमावत, राष्ट्रवादी युवक गट प्रमुख रूपेश पाटील, विद्यार्थी प्रमुख विवेक कुमावत, उपसरपंच नीलेश खोडपे, प्रशांत वाघ, ऋषिकेश पाटील व राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...