आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनसंवाद यात्रेला सुरुवात:पाचाेरा ; भडगावात राष्ट्रवादी सुरू करणार जनसंवाद यात्रा

भडगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाचोरा, भडगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात पोहाेचून स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी व पक्ष बळकटीसाठी जनसंवाद यात्रा सुरू केली जाईल, अशी माहिती गटनेते संजय वाघ यांनी दिली.श्रीक्षेत्र कनाशी येथून २ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता माजी मंत्री एकनाथ खडसे, रवींद्र पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेला सुरुवात होईल. या यात्रेदरम्यान टप्प्याटप्प्याने मतदार संघातील प्रत्येक गावापर्यंत जाऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विचार पोहोचवण्यासोबतच राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काम केले जाणार आहे.

जनसंवाद यात्रेनिमित्त आघाडी सरकारने मागील काळात शेतकरी, कामगार, जनसामान्यांसाठी घेतलेले निर्णय व विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यादरम्यान गावातील स्थानिक समस्या जाणून घेण्याचा ही दिलीप वाघ यांचा मानस आहे.

याशिवाय आगामी विविध निवडणुकांसाठी सामान्य कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांनी दिली. जनसंवाद यात्रेत पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहे.