आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित महिला महोत्सवात, समूह नृत्य स्पर्धेत गोंधळ नृत्य सादर करणाऱ्या न्यू प्लॉट महिला मंचला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दुसऱ्यांदा हा ग्रुप विजयाचा मानकरी ठरला. तर सोलो डान्स स्पर्धेत नृत्यांगना नयना कुळकर्णी विजेत्या ठरल्या. महिला व बालकल्याण विभाग, अमळनेर नगरपरिषद आणि अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे गौरीसुत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने, सावित्रीबाईंच्या लेकींचा भव्य महिला महोत्सवाचा बक्षीस समारंभ मंगळवारी पार पडला. यावेळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, आमदार अनिल पाटील, सुनीता मोडक, शरद उगले, माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, गौरीसुत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप घोरपडे, पालिकेचे प्रकल्प अधिकारी मुसळे उपस्थित होते.
याप्रसंगी महिला मंच सदस्यांच्या //"सूर तेच छेडिता//" या ऑर्केस्ट्राने धम्माल उडवली. सुरेख गीते सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यानंतर विविध स्पर्धांचा निकाल घोषित होऊन बक्षीस वितरण समारंभ झाला. अमळनेरच्या या उत्सवात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. हाच खरा आनंदाचा क्षण असून हा उत्सव अखंडित सुरू ठेवावा अशी अपेक्षा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली. अध्यक्षा डॉ.अपर्णा मुठे व उपाध्यक्षा तिलोत्तमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. आभार कांचन शाह यांनी मानले. सेक्रेटरी सरोज भांडारकर, खजिनदार कांचन शाह, भारती गाला, करुणा सोनार, पद्मजा पाटील, प्रा.शिला पाटील, विजया देसरडा, विद्या हजारे, वसुंधरा लांडगे, उज्वला शिरोडे यांनी परिश्रम घेतले.
महिलांनी पुढे यावे अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी संवाद साधला. महिलांनी व्यासपीठावर येण्याचे धाडस करावे. कुणी टिंगल केली म्हणून खचून जाऊ नये. पुढील वर्षी महोत्सवात प्रत्येक स्त्री ला एक झाड आपण देऊ या, त्यामुळे मला नक्कीच अमळनेर शहर हिरवेगार झालेले दिसेल. महिलांनी घराच्या पलीकडे जाऊन काहीतरी काम करावे. जेणेकरून घरच्यांना त्यांची किंमत कळेल. प्रत्येक व्यक्तीने कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, त्यामुळे कुटुंब आनंदी राहते. बक्षीस मिळाले तर आनंद व्यक्त करा, पण नाही मिळाले तर पुन्हा प्रयत्न करा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.