आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विमा रकमेसाठी निंभोरा‎ स्टेट बँकेसमोर ठिय्या‎

निंभोरा‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्टेट बँकेत मागील वर्षी‎ केळी पीक विम्याची रक्कम कापली ‎ ‎ गेली. यानंतर ५० दिवस विमा मंजूर ‎ ‎ होऊन देखील १६ शेतकऱ्यांच्या‎ खात्यात रक्कम मिळाली नव्हती. ‎याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या‎ ओबीसी सेलने ७ नोव्हेंबरला ठिय्या ‎ ‎ आंदोलनाचा इशारा दिला. होता. ‎ ‎ त्यासाठी स्टेट बँक शाखा‎ व्यवस्थापक राधेश्याम मुंगमुळे यांना ‎निवेदन दिले होते.

त्याची दखल न‎ घेतल्याने सोमवारी ठिय्या आंदोलन‎ करण्यात आले.‎ बँक व्यवस्थापकांनी एक पत्र देत‎ शेतकऱ्यांना रक्कम मिळावी यासाठी‎ प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. मात्र‎ शेतकऱ्यांनी आक्षेप घेत बँकेची हमी‎ मिळावी अशी मागणी व‎ घोषणाबाजी केली. यानंतर बँक‎ व्यवस्थापक मुंगमुळे यांनी वरिष्ठ‎ अधिकारी, कृषी उपसंचालक‎ अनिल भोकरे यांच्यासोबत चर्चा‎ केली. विमा कंपनी व बँकेच्या‎ वरिष्ठांना मेल करत आम्हाला काही‎ दिवसांचा अवधी द्यावा अशी विनंती‎ ‎शेतकऱ्यांना केली.

कृषी‎ विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे‎ ही समस्या मांडण्यात येईल, अशी‎ माहिती मुंगमुळे यांनी लेखी पत्रातून‎ दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे‎ घेण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा‎ उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,‎ डॉ.एस.डी.चौधरी, माजी‎ पं.स.सदस्य प्रमोद कोंडे, ऐनपूर‎ ग्रा.पं.सदस्य किशोर पाटील, ऐनपूर‎ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोहन कचरे,‎ माजी सरपंच डिगंबर चौधरी,‎ प्रा.दिलीप सोनवणे यांसह शेतकरी‎ गोपाळ भिरुड, धीरज भंगाळे,‎ रामभाऊ सोनवणे उपस्थित होते.‎

शेतकऱ्यांना न्याय‎ मिळेल‎
आजच्या आंदोलनाबाबत वरिष्ठांना‎ कळवले. संबंधितांना तातडीने मेल‎ केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना‎ भेटून या प्रकरणाची माहिती देणार‎ आहोत. यात थोडा उशीर लागेल‎ मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळेल.‎ - राधेश्याम मुंगमुळे, शाखा‎ व्यवस्थापक, स्टेट बँक, निंभोरा‎

बातम्या आणखी आहेत...