आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी बेपत्ताच:अपहरणानंतर नऊ महिने उलटूनही मुलगी बेपत्ताच

पारोळा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील करमाड खुर्द येथे नऊ महिन्यांपुर्वी अल्पवयीन मुलीस २९ वर्षीय तरुणाने मारहाण करून फेब्रुवारीत पळवून नेले होते. या मुलीचा आजवर थांगपत्ता लागत नसल्याने, मुलगी जगात आहे किंवा नाही? असा प्रश्न मुलीच्या आईने गुरुवारी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

करमाड खुर्द येथील अल्पवयीन मुलीचे वडील २४ फेब्रुवारीला रात्री दीड वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. घरी मुलीसह तिची आई आणि वृद्ध आजी-आजोबा झोपले होते. त्यावेळी २९ वर्षीय संशयित प्रमोद साहेबराव पाटील याने घरात घुसून अल्पवयीन मुलीच्या आईला धक्काबुक्की करून मुलीला पळवून नेले. याबाबत २५ फेब्रुवारीला पोलिसात अपहरणाची तक्रार दिली. मात्र नऊ महिने उलटूनही तपास लागलेला नाही. याउलट मुलाचे वडील आणि काका यांच्याकडून, केस मागे घेण्यासाठी ठार मारण्याची धमकी दिली जाते, असे मुलीच्या पालकांनी सांगितले. पोलिसांकडून शोध घेतला जात नाही, तसेच संशयितांना अटक केली जात नाही, असा आरोप केला.

मोबाइल ट्रॅकरवर टाकले
या घटनेत कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल असून, संशयित तरुण व पीडीत मुलीकडे मोबाईल नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. तरी त्यांच्या कुटुंबियांचे मोबाइल ट्रॅकरवर घेतले असून कसून शोध सुरू आहे.राजू जाधव, पोलिस उपनिरीक्षक

बातम्या आणखी आहेत...