आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:अवैध उत्खननाची चौकशी नाही,‎ आयुक्तांचा आदेश धुडकावला‎

कजगाव‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पारोळा रोडवरील गट क्रमांक ३०५‎ मधील अवैध उत्खननाची तक्रार करण्यात‎ आली होती. हा गट ग्रामपंचायत मालकीचा‎ आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी‎ चौकशी करुन दोषींवर कारवाईचे निर्देश दिले‎ होते. मात्र, या निर्देशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष‎ झाले आहे. त्यामुळे तक्रारदार भूषण पाटील‎ यांनी पुन्हा विभागीय आयुक्तांकडे लेखी‎ तक्रार केली आहे.‎ शेजारील स्टोन क्रेशरधारक दगडाचे अवैध‎ उत्खनन करत असून, शासनाचा लाखो‎ रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.

या‎ संदर्भात भूषण पाटील यांनी ३ ऑक्टोबरला‎ विभागीय आयुक्त कार्यालयात‎ आत्महदहनाचा इशारा दिला होता. त्यापुर्वी‎ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांचे‎ म्हणणे ऐकून प्रकरणाची चौकशी करून‎ दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, विभागीय‎ आयुक्तांनी जिल्हाधिकारी आणि भडगाव‎ येथील तहसीलदारांना दिले होते. परंतु‎ संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या‎ आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे भूषण‎ पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी पुन्हा‎ आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. याप्रकरणी‎ काही राजकारणी दबाव आणत असून, १५‎ दिवसांत मोजमाप करून संबंधितांवर कारवाई‎ करावी, अशी मागणी केली आहे. कारवाई‎ होते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.‎

बातम्या आणखी आहेत...