आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:पहिल्या दिवशी एकही हरकत, सूचना प्राप्त नाही; नव्या रचनेबाबत कमालीची उत्सुकता

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरकतींसाठी उरले केवळ चार दिवस; प्रभाग संख्येत एकाची भर, दोन नगरसेवकही वाढणार

शहरवासीयांचे लक्ष लागून असलेल्या नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आहे. त्यावर १० मे पासून हरकती दाखल करता येणार आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी एकही हरकत आली नसल्याची माहिती पालिकेतून मिळाली. आता प्रभाग रचनेच्या आराखड्याबाबत हरकतीसाठी केवळ चारच दिवस शिल्लक आहेत.

दरम्यान या नव्या रचनेत नव्या प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक २ हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. येथील पालिकेची मुदत ३० डिसेंबर रोजीच संपली असून येथे सध्या मुख्याधिकारी हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेली प्रभाग रचना २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केली. या आराखड्यात पालिकेत एक प्रभाग वाढला असून नगरसेवकांची संख्याही दोनने वाढली आहे.

त्यामुळे पूर्वीच्या प्रभागांत एकाची भर पडून १८ प्रभाग झाले आहेत तर ३४ नगरसेवकांची संख्या होती ती आता ३६ वर गेली आहे. प्रभाग क्रमांक एकची सुरुवात ही मालेगाव रस्त्याने न होता आता नव्याने धुळे रस्त्याकडून करण्यात आली आहे. तर यापूर्वीचा १७ क्रमांकाच्या प्रभागाची विभागणी करून ते प्रभाग क्रमांक १७ व १८ असे करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...