आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:तापी सहकारी सूतगिरणीसाठी 163 जणांचे उमेदवारी अर्ज

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तापी सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २१ जागांसाठी तब्बल १६३ जणांनी आपले उमेदवारी दाखल अर्ज केले आहेत.

यात कापूस उत्पादक मतदार संघात एकूण १५ जागांसाठी १०० तर बिगर कापूस उत्पादक मतदार संघात एका जागेसाठी १२, इतर मागासवर्गीय मतदार संघात एका जागेसाठी २३, महिला राखीव मतदार संघात दोन जागेसाठी एकूण १५, अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी ६, भटक्या विमुक्त एका जागेसाठी ७ असे एकूण १६३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या पाच दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती.

आज उमेदवारांना दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७१ अर्ज दाखल केले. नामनिर्देशन पत्रांची ७ रोजी दुपारी १२ वाजता सूतगिरणीच्या चोपडा शहरातील कार्यालयात छाननी होणार आहे. तर ९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २४ रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ४ या वेळी मतदान प्रक्रिया पडेल. तर ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, सध्य-स्थितीत गेल्या ५ वर्षापासून तापी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन म्हणून माजी आमदार कैलास पाटील हे कार्यभार सांभाळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...