आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवर्तन:बिगर सिंचनाचे आवर्तन; प्रशासनातर्फे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने या गावांनी नुकतीच गिरणेतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यात पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील काही गावांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून १६ रोजी सायंकाळी ६ वाजता १५०० क्युसेस इतके पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले.

या वर्षाचे हे पाचवे आणि शेवटचे आवर्तन असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली. आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जळगाव येथील गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी दिले होते. हे पाणी भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा ते कानळदा गावापर्यंत पोहोचणार आहे.

शेतकऱ्यांनी पंप बंद ठेवावे
गिरणा धरणातून यंदा आतापर्यंत सिंचनासाठी तीन तर पिण्यासाठी दोन असे एकूण पाच आवर्तने सोडण्यात आली आहेत. हे आवर्तन बिगर सिंचनाचे असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेती पंप बंद ठेवावेत. तसेच नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...