आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:पाचोऱ्यात शिवसेना नव्हे; कॉन्ट्रॅक्टर सेना वाढली

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या पक्षाने राजकीय ओळख दिली, त्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. पाचोऱ्यात शिवसेना नव्हे तर कॉन्ट्रॅक्टर सेना वाढली, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. बुधवारी रात्री मानसिंगका मैदानावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. सुषमा अंधारे यांनी भाजप, शिंदे गट, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली. कोरोनाच्या काळात पाचोरा शहरातील दहा भूखंडावरील बॅन कुणी उठवला, याचा पुरावा आपल्याकडे आहे असे त्यांनी सांगितले.

किरीट सोमय्या हे पाचोऱ्यात झालेला भूखंड घोटाळा ते कधी जनतेसमोर आणणार याबाबत मी त्यांना प्रश्न विचारणार आहे, असे अंधारे म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यात गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ व गुलाबराव पाटील हे तीन गुलाब असतांना येथे कमळ कसे फुलले असा टोलाही लगावला. यावेळी गुलाबराव वाघ, युवा सेनेचे शरद कोळी, वैशाली सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख दीपक राजपूत, हर्षल माने, विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, संपर्कप्रमुख सुनील पाटील, अभय पाटील, समाधान पाटील उपस्थित होते.

वडिलांचा फोटो लावाल तर खबरदार : सूर्यवंशी
स्व.आर.ओ.पाटील यांचे नाव वापरुन दोनवेळा आमदार झाले, तरी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. माझ्यासमोर भाऊ, बहीण कोणीही आले, तरी त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही, अशी भाषा वापरतात. माझ्या वडिलांचा फोटो बॅनरवर लावला तर याद राखा, आशा शब्दात वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांचा समाचार घेतला.

बातम्या आणखी आहेत...