आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 कोटींचा अपहार:धरणगावचे तत्कालीन सीओ, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

धरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपरिषदेत २० कोटींचा अपहार झाल्याबद्दल धरणगाव येथील जनजागृती मंच तथा माहिती अधिकारी कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुराव्यासह फौजदारी याचिका अॅड. भूषण महाजन यांच्या वतीने दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी नुकतिच पार पडली. उच्च न्यायालयाने मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार धरणगाव नगरपरिषदेच्या लेखापरीक्षण २०१७-१८ आणि २०१८-१९ मधील अहवालानुसार, चेतन सोनार वास्तु विशारद, पद्मालय कंट्रक्शन अनंत पाटील यांच्यासह सास्ते कन्स्ट्रक्शन, आदर्श सर्व्हीसेस, गजानन इंटरप्राईजेस, ज्ञानेश्वरी कन्स्ट्रक्शन, एम.ए.कन्स्ट्रक्शन, फ्लोवेल कन्स्ट्रक्शन, आशिष डायकेम काॅर्पोरेशन, तत्कालीन नगराध्यक्ष प्रवीण रघुनाथ चौधरी आणि तत्कालीन मुख्याधिकारी सपना वसावा यांच्याविरुद्ध शासकीय दस्तावेजाचे बनावटीकरण, अपहार, न्यायभंग तसेच निधीची चोरी अशा सदराखाली गुन्हा नोंदवण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

त्या संदर्भात १८ रोजी ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली. ही सुनावणी न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती अभय वायबसे यांच्या न्यायपीठासमोर पार पडली. त्यात पोलिस निरीक्षक, जिल्हाधिकारी, लेखापरीक्षक तसेच मुख्याधिकारी यांना नोटीस बजावली आहे. १३ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...