आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहार:26 महिन्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत पहिल्याच दिवशी पोषण आहार

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार देणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून जून व जुलै महिन्यातील ४५ दिवस पुरेल एवढा धान्यसाठा शाळांना वितरीत केला जात आहे. गेल्या २६ महिन्यांपासून शाळेत आहार शिजवून वाटप करणे शासनाने बंद केले होते. त्या बदल्यात विद्यार्थ्यांना घरी धान्यादी मालाचे वाटप शाळा स्तरावरून केले जात होते. परंतु यंदा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी शाळांनी तयारी सुरू केली आहे. विद्यार्थी शाळेत नियमित हजर राहावेत यासाठी शासनाने शाळेत पोषण आहार देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. त्या काळात विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ शाळेत न देता, घरीच धान्यादी मालाचे वाटप करण्यात येत होते. मात्र यंदा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी १३ जूनपर्यंत प्रत्येक शाळेत धान्यादी माल पोहोचवण्यासाठी पुरवठा विभाग तयारी करत आहे. अमळनेर तालुक्यात २२४ शाळा शालेय पोषण आहारासाठी पात्र आहेत. त्यात सुमारे २८ हजार ९७३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.

शाळेतच शिजणार आहार कोरोनामुळे पोषण आहार वितरण बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरदेखील शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. मार्च १५ मार्चपासून शाळेत पोषण आहार शिजवण्याची परवानगी शासनाने दिली होती. मात्र मार्च महिन्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा व कोरोनाचा असलेले सावट मुळे शाळांनी पोषण आहार शिजवण्यात रस घेतला नव्हता. त्यामुळे आता १३ जून पासून प्रत्येक शाळेत पोषण आहार योजना पूर्वरत सुरू होणार आहे.

^कोरोना काळात आहार शिजवून न देता तो प्रत्येक विद्यार्थ्याला शिधा वाटप केला जात होता. मात्र या शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेला पहिल्याच दिवशी पोषण आहार शिजवणे बंधनकारक केले आहे. तशा सूचना शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. केंद्र निहाय मालाचे वाटप सुरू आहे. - भूपेंद्र बाविस्कर, शालेय पोषण आहार अधीक्षक, पं.स.अमळनेर १९४ शाळांना गॅस कनेक्शन तालुक्यात २२४ शाळांपैकी फक्त ३० शाळांकडे शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस कनेक्शन आहे. मात्र उर्वरित १९४ शाळा चुलीवर पोषण आहार शिजवीत आहेत. उर्वरित शाळांना या शैक्षणिक वर्षात गॅस कनेक्शन घेण्यासाठी चार हजार ९० रुपये शासनामार्फत निधी मिळणार आहे. त्यातून प्रत्येक शाळेला शेगडी व एलपीजी गॅस कनेक्शन घ्यायचे आहे. त्यामुळे आगामी काळात शाळेत पोषण आहार शिजवताना येणाऱ्या अडचणी दूर होतील.

बातम्या आणखी आहेत...