आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या २० ते २५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्याच्या मुद्द्यावरुन पाचोरा शहरात २० तारखेपासून राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व समता सैनिक दल आणि पाचोरा शहरातील सर्व पुरोगामी, राजकीय, सामाजिक, सहयोगी संघटनांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. हे उपोषण मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले आहे.
या आंदोलनाची प्रमुख जबाबदारी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी घेतली होती. दरम्यान, आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांनी या उपोषणाची दखल घेत आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून उपोषणाची सांगता करावी, असे सुचवले होते. उपोषणस्थळी पीटीसीचे चेअरमन व पालिकेचे गटनेते संजय वाघ, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे आदींनी प्रशासन व उपोषणकर्त्यांनी भूमिका व मागणी लक्षात घेतली.
त्यानंतर पालिका प्रशासनाने नम्रतेची भूमिका घेत सर्व मागण्या मंजूर करत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात स्मारक संदर्भात एनओसीचा ठराव, जागेचा उतारा, पीडब्ल्यूडीला दिलेल्या इस्टिमेटसाठीचे पत्र आदी महत्त्वाचे कागदपत्रे देत व उपस्थित मान्यवरांच्या मध्यस्तीने उपोषणाची सांगता करण्यात आली. या वेळी मान्यवरांसह मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, नाना देवरे, हरुन देशमुख, नंदू सोनार, नितीन संघवी, पप्पू राजपूत, दीपक अदिवाल, अजहर मोतीवाला, मतीन बागवान, योगेश महाजन, मच्छिंद्र जाधव, विलास पाटील, माजी नगरसेवक विकास पाटील, किशोर बारवकर, भालचंद्र ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
आंदोलनाला पाठिंबा
या उपोषणाला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिव स्वराज्य युवा फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवक काँग्रेस, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, अ.भा. महात्मा फुले समता परिषद व अन्य संघटनांचा पाठिंबा होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.