आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील नगरपरिषदेने चालू आर्थिक वर्षाची चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणी भांडवली मुल्यावर आधारित आहे. त्यावर हरकती व सुनावणी घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भांडवली कर आकारणी रद्द करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत लेखी स्वरूपात नगरपरिषदेकडे हरकती व तक्रारी नोंदवलेल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापित करून नागरिकांना अपील करण्याचे आवाहन केले आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी भांडवली कर आकारणीला स्थगिती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.
त्यावर नगर विकास विभागाने तात्पुरती स्थगिती दिली. सुधारीत भांडवली मुल्यावरील कर आकारणी लागू करताना, पुर्वीची व आताची वाढीव घरपट्टी यातील तफावत विचारात घेतली नाही. तसेच कोरोनानंतर सर्वसामान्य सावरत असताना, वाढीव घरपट्टीचा बोजा पेलवणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. प्रचलित कर प्रणालीत मालमत्तेच्या वापरण्यात येणाऱ्या क्षेत्राच्या भाडेमुल्यावर मालमत्ता कर आकारला जात होता. परंतु नवीन भांडवली मुल्यानुसार आकारणी करताना मालमत्तेचे बखळ क्षेत्रफळ, बांधीव क्षेत्रफळ, पार्किंग, जिने, ओटे, पॅसेज यांचे मूल्य काढून त्यावर सुधारित मालमत्ता कर आकारणी केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.