आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कही खुशी, कही गम’:प्रभागातील सोयीस्कर भाग वगळण्यासह नागरिकांची वाढीव नावे दुसऱ्या प्रभागामध्ये टाकल्याबाबत हरकती

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभाग रचनेबाबत नगरसेवक राजेंद्र चौधरी, ठाकूर, देशमुखांचा आक्षेप

नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यावर हरकती व सूचनांचा कार्यक्रम सुरू आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर विद्यमान नगरसेवकांपैकी काहींना दिलासा मिळाला तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे चित्र आहे.

नगराध्यक्षा आशालता चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना कुमावत, भाजपचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी समाधान व्यक्त केले असले तरी याच पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. आघाडीचे नगरसेवक बंटी ठाकूर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक शाम देशमुख यांनीही प्रभाग रचनेबाबत हरकत घेतली.

बातम्या आणखी आहेत...